Monday, May 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Winter Session: इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेत्यांशिवाय कामकाज! अधिवेशनात विरोधकांचा सरकारी चहापानावर बहिष्कार; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 7 December 2025, 18:47
Maharashtra Winter Session: For the first time in history, proceedings without opposition leaders! Opposition boycotts government tea party in session; What exactly happened?

नागपूर: राज्य सरकारचे यंदाचे (Maharashtra Winter Session) हिवाळी अधिवेशन चांगलेच (Nagpur News) गाजण्याची चिन्हे दिसत असून त्याआधीच राजकीय वातावरण तापले आहे. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणे, विरोधी पक्षनेता न निवडणे आणि सरकारची कथनी-करणी यामध्ये फरक असल्याचा आरोप करत चहापानाला जाण्याचे कारण काय, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.

विरोधकांनी घटनेत तरतूद असताना विरोधी पक्षनेता का निवडला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नाही. विधान परिषदेत ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते होते, मात्र गेल्या सत्रात त्यांचा कार्यकाळ संपल्याने सध्या ते पद रिक्त आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनातही दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते निवडले जाण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे, कारण कामकाज पत्रिकेत याबाबत कोणताही उल्लेख नाही.

 

2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकाही विरोधी पक्षाला एकूण जागांपैकी किमान 10 टक्के जागा मिळाल्या नाहीत. 288 सदस्यांच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता होण्यासाठी किमान 29 आमदारांची आवश्यकता असते. मात्र महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे तेवढे आमदार नाहीत. ठाकरे गटाकडे 20, काँग्रेसकडे 16 तर शरद पवार गटाकडे 10 आमदार आहेत. विधान परिषदेत मात्र काँग्रेसकडे 8 आमदार असल्याने 10 टक्क्याचा निकष पूर्ण होत असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.

दरम्यान, सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. सरकारमध्ये सौहार्द आणि सज्जनता नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवर टीका करत, विरोधी पक्षनेतेपद हवे असेल तर तेवढे आमदार निवडून आणा, असा टोला लगावला.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोमवार, 8 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचार, राज्यावरील कर्जाचा वाढता बोजा, शेतकऱ्यांना अपुरी मदत, बेरोजगारी आणि मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची बैठकही पार पडली असून, येत्या काळात सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post
Pune News: Workshop on Prime Minister's Micro Food Processing Initiative Scheme concluded in Maval!

Pune News: प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रम योजनेवर मावळमध्ये कार्यशाळा संपन्न!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.