पुणे : सध्या परतीचा पाऊस सुरु आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने जोर धरला आहे. मागील आठवडाभरापासून पावसाची संसतधार सुरु असल्याने नद्या-नाल्यांना मोठा पूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, आजही काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पुढील महिन्यात शनिवारपर्यंत राज्याच्या बहुतेक भागांत उघडीप असणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून जोरदार पाऊस पडणार नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.