पुणे : यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान बुधवारी (दि.20 नोव्हेंबर) रोजी पार पडले. अशातच, पुण्यात मात्र अजित पवारच मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. परंतु काही वेळातच हे बॅनर काढण्यात आले आहे. बॅनर काढल्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सरु झाल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच अजित पवार गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. संतोष नांगरे यांचे समर्थक करण गायकवाड, कायर्कर्त्यांनी उत्साहात पर्वती मतदारसंघात बॅनर लावले आहे. या बॅनरवर ‘मुख्यमंत्री अजितदादा पवार’, ‘विकासाचा वादा… अजितदादा’ अशा आशयाचे होर्डिंग लावले आहे. त्यात मुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रचंड मतांनी विजय झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.
पुण्यात लावण्यात आलेले बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण आता हे पोस्टर हटवण्यात आले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता राज्यात कोणाचं सरकार येणारं याबाबत सर्वाचं लक्ष लागलं आहे. राज्यात महाविकास आघाडी की महायुतीचे सरकार येणार हे उद्या 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.
#WATCH | महाराष्ट्र: NCP प्रमुख और उपमुख्यमंत्री अजित पवार को मुख्यमंत्री के रूप में दिखाने वाला एक पोस्टर, पार्टी नेता संतोष नांगरे द्वारा पुणे में लगाया गया। जिसे अब हटा लिया गया है।#MaharashtraElection2024 के लिए मतगणना कल, 23 नवंबर को होगी। pic.twitter.com/KOnVB1altY
— ANI_HindiNews (@AHindinews) November 22, 2024