शिरूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन अजंठा आणि वेरुळ येथे पर्यटकांसाठी अभ्यागत केंद्र उभारण्यात आली आहेत. प्रथम काही तांत्रिक कारणांमुळे आणि नंतर कोरोना महामारीमुळे सदरची केंद्रे मागिल काही कालावधीपासुन बंद ठेवण्यात आली होती. जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यामुळे भारताचा विकास आणि सांस्कृतिक विविधता प्रदर्शित करण्याची अनोखी संधी या निमित्ताने भारतास मिळत आहे. जी-२० परिषदेच्या पार्श्वभुमीवर सदरची अभ्यागत केंद्रे महामंडळामार्फत सुरु करण्यात आली आहेत.
जी-२० आणि डब्ल्यू २०च्या सदस्यांची परिषद आणि भेट महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वेरूळ अभ्यागत केंद्रामध्ये मध्ये दि. 28 फेब्रुवारी रोजी पार पडली. जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले वेरुळ अभ्यागत केंद्र हे वेरुळ लेण्यांमधील कैलास लेण्यांच्या समोरच साधारणपणे ५०० मीटर अंतरावर आहे. ही दोन्ही अभ्यागत केंद्रे सुरु होण्यासाठी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा हे अत्यंत आग्रही होते.
त्यानंतर पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांनी ही अभ्यागत केंद्रे जी-२० परिषदेपुर्वी पर्यटकांसाठी सुरु करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सदरची अभ्यागत केंद्रे आता सुरु झाली आहेत.
या ठिकाणी प्रशस्त वाहनतळ असुन ४० बसेस, १०० चारचाकी आणि २०० दुचाकी उभ्या राहु शकतात. सर्वसुविधायुक्त असे २ ऑडीटोरीयम असुन या ठिकाणी साधारणपणे लोकांच्या बसण्याची व्यवस्था आहे. दोन उपहारगृहे असुन या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रदर्शनासाठी दोन हजार चौ मी इतक्या क्षमतेचे प्रदर्शनासाठी हॉल तयार करण्यात आले आहेत. उघडया सभागृहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची सुविधा असुन या ठिकाणी साधारणपणे १५० लोकांची बैठक व्यवस्था आहे.
म्युरल्स आणि पेंटीग्स साठी प्रदर्शन गॅलरी असुन एका ठिकाणी कैलास लेण्यांची १/१० या आकारामध्ये विलोभनीय प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी स्थानिक लोकलाकार आणि हस्तकला यांच्या विक्रीसाठी ६४ दुकानगाळे तयार करण्यात आले आहेत. पर्यकांसाठी सर्व सुविधांनी युक्त अशी स्वच्छतागृहे, माता-बालक आणि महीलांसाठी स्वतंत्र विश्रामकक्ष / शिशु कक्ष यांची सुविधा आहे.
अजिंठा येथील दृकश्राव्य माध्यमातून अजिंठा लेण्यांबद्दल माहिती देणे, वाचनालय, उपहारगृहे, वाहनतळ व भूरेखांकन इत्यादी सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. यात डोम थियटर व दृकश्राव्य थियटरसुद्धा आहेत. या अभ्यागत केंद्रामध्ये एस्केलेटर व लिफ्ट, ई. अशा अत्याधुनिक सुविधाही आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी दोन उपहारगृहांची सोयसुद्धा करण्यात आली आहे.
दरम्यान, लेण्यांचे सौदर्य पाहुन अचंबित झालेले जी-२० च्या सदस्यांचे वेरुळ येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कोरोना कालावधीनंतर पुर्ननिर्मित केलेल्या पर्यटक अभ्यागत केंद्रामध्ये जी-२० आणि डब्ल्यू २० सदस्यांचे ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक श्रध्दा जोशी, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांण्डेय, महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
पाहुण्यांना डिजीटल क्षेत्रात भारताने मिळवलेल्या यशाचे धडे, टेक्नोलॉजीची देवाण घेवाण आणि क्षमता उभारणीच्या संदर्भातल्या चांगल्या प्रथा सदस्य राष्ट्रांसमोर ठेवण्यात आली. महीलांना केंद्रस्थानी ठेवुन सर्वसमावेशक विकास, लघुउद्योगांचे सशक्तीकरण स्थानिक कलाकुसर जसे पैठणी, हिमरु, इ. अव्दितीय हस्तकला आणि कलात्मक वारसा यांचे प्रदर्शन वेरुळ अभ्यागत केंद्रामध्ये विविध संस्थांकडुन करण्यात आले.
सदरचे अभ्यागत केंद्र यापुढे नियमित सुरु राहावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी केले आहे.