पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर येथे तांत्रिक अधिकारी, कायदेशीर सल्लागार आणि वर्गीकरण सल्लागार या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत तीन रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर जैवविविधता भवन, कदीमबाग, सिव्हिल लाइन्स, नागपूर- ४४००१ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://mahaforest.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– वयोमर्यादा : 65 वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 03 जानेवारी 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जानेवारी 2025.
– अर्ज करण्याचा ई- मेल आयडी : [email protected]