पुणे : अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत वार्षिक दोन दिवसीय अधिवेशन २० व २१ ऑगस्टला होणार आहे. हे अधिवेशन देशमुख फार्म हाऊस, धोम, वाई धोम रोड, वरखडवाडी ता. वाई, जि सातारा या ठिकाणी आदी मान्यवर व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी दिली.
या अधिवेशनासाठी १२ जिल्हे, २ महानगरे (१०७ तालुके) यामधून पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, तसेच २ महानगरे पुणे व कोल्हापूर शहर या जिल्ह्यातील एकूण १०७ तालुक्यातील दोन हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी (ता. २०) सकाळी १० वाजता माजी राज्यपाल (सिक्कीम), खासदार श्रीनिवास पाटील व राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या हस्ते होणार आहे. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष अ. भा. ग्राहक पंचायत राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शहा हे असतील. तर या कार्यक्रमाला उपस्थिती हि राज्य उत्पादन शुल्क, राज्यमंत्री शंभूराजे देसाई, आमदार शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील,यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दरम्यान, कार्यक्रमाचा समारोप रविवारी (ता. २१) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय संघटन मंत्री अ. भा. ग्राहक पंचायत दिनकरजी सबनीस, तर प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, राष्ट्रीय सचिव अरूण देशपांडे, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य धनंजय गायकवाड, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन सातारा जिल्हा व जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहे, त्यामुळे या अधिवेशनात सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान बाळासाहेब औटी यांनी केले आहे.