सागर जगदाळे
भिगवण : इंदापूर तालुक्यातील मदनवाडी ते तरंगवाडी असे १९ तलाव भरण्याची मागणी माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांचेकडे केली आहे.
दरम्यान खडकवासला प्रकल्प कार्यकारी अभियंता यांनी त्याला मान्यता दिली असुन गुरुवार(ता.१४) पासुन कालव्याद्वारे इंदापुर तालुक्यातील तलाव भरण्यासाठी सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली आहे.
सध्या राज्याच्या काही भागात जरी मुसळधार पाऊस सुरु असला तरीही इंदापुर तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस नाही. इंदापुर तालुक्याच्या एका बाजुला निरा तर दुसऱ्या बाजुला भिमा नदी आहे. या दोन्ही नदयाच्या मधल्या भागांमधील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मदनवाडी ते तरंगवाडी दरम्यान १९ पाझर तलावांची निर्मिती केली आहे. हे तलावांमध्ये खडकवासला कालव्याच्या माध्यमतुन पाणी सोडण्यात येते.
बऱ्याच वेळा योग्य नियोजनाअभावी तलावात पाणी सोडले जात नसल्यामुळे तलावावर अवलंबुन शेतकऱ्यांना फटका बसतो.
सध्या खडकवासला धरण परिसरांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे व धरण शंभर टक्के भरले असुन धरणातुन विसर्ग सुरु करण्यात आला.
इंदापुर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने इंदापुर तालुक्यातील १९ पाझर तलाव भरणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेऊन माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुढाकार घेत खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांचेकडे खडकवासला कालव्याच्या माध्यमातुन इंदापुर तालुक्यातील १९ पाझर तलाव भरण्याची मागणी केली होती.
श्री. पाटील यांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांनी गुरुवार(ता.१४)पासुन खडकवासला कालव्यातुन पाणी सोडुन इंदापुर तालुक्यातील तलाव भरण्यास मान्यता दिली असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली आहे.
याबाबत श्री पाटील म्हणाले, सध्या खडकवासला धरण परिसरांमध्ये पाऊस सुरु आहे. धऱणही भरले आहे त्यामुळे धरणातील पाण्याच्या माध्यमातून इंदापुर तालुक्यातील पाझर तलाव तलाव भरण्याची विनंती खडकवासला पाटबंधारे विभागातील अभियंता यांचेकडे केली होती त्यास मान्यता दिली असुन गुरुवार(ता.१४) पासुन खडकवासला कालव्याच्या माध्यमातुन इंदापुर तालुक्यातील १९ पाझर तलाव भरण्यात येणार आहे.