लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर पोलिस ठाणे दिड वर्षापुर्वी शहरात गेल्यापासुन वरीष्ठ पोलिस निरीक्षक म्हणुन कार्यरत असलेले राजेंद्र मोकाशी यांची दहा दिवसापुर्वी बदली होऊन, त्यांच्या जागी डॅसिंग पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण रुजु झाले आहेत. दत्तात्रेय चव्हाण यांनी पुणे शहरात विविध ठिकाणी यापुर्वी चांगले काम केलेले असल्याने, लोणी काळभोर पोलिस ठाण्यातही ते चांगलेच काम करतील अशा चर्चा सुरु झालेल्या आहेत. मात्र मागिल दहा ते बारा दिवसाच्या कालावधीत नवनिर्वाचीत पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण साहेब, आपले हौसे-गवसे व नवसे यांच्याकडुन सत्कार स्विकारण्यात दंग झाल्याने, साहेब आपल्या डॅसिंग कामाचा जलवा कधी दाखवणार याकडे लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरीकांचे लक्ष लागुन राहिले आहे.
जिल्हा ग्रामिन पोलिसांच्या हद्दीत असलेले लोणी काळभोर पोलिस ठाणे दिड वर्षापुर्वी शहर पोलिसांच्या हद्दीत सामाविष्ठ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. लोणी काळभोर पोलिस ठाणे शहर पोलिस येताच, अधिकारी म्हणुन वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांची वर्णी लागली. या दिड वर्षाच्या काळात पोलिसांच्या कामगिरीपेक्षा, पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मटका, गावठी दारु, बेकायदा गुटखा विक्रीच्याच बातम्या जास्त गाजल्या. बारा वर्षापुर्वी लोणी काळभोरचे तत्कालिन पोलिस निरीक्षक सुहास गरुड यांच्या काळात पोलिसांनी केलेले काम व मागिल दिड वर्षाच्या काळात पोलिसांची कामगिरी यांची तुलना करण्यातच नागरीकांचे दिड वर्षे कधी संपले हे समजले नाही. मात्र नवनियुक्त डॅशिंग पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांची यापुर्वीची कामगिरी पहाता, ते सुहास गरुड यांच्या प्रमानेच काम करतील असा विश्वास वाटु लागला आहे.
सिंघम पोलीस आधिकारी म्हणून नावलौकिक कमावलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षक सुहास गरुड यांच्या नंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बरेच आधिकारी आले व गेले. परंतु आपल्या कामाच्या पद्धतीचा न मिटणारा ठसा जो सुहास गरुड यांनी उमटवला, तसा ठसा उमटवण्यासारखी कामगिरी करणे नंतरच्या नऊ वर्षांतील एकाही आधिकार्याला जमले नाही. नवनियुक्त पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण आपल्या कामगिरीने सुहास गरुड यांची “सिंघम पाॅलीसी” ची परंपरा पुढे चालवतील कि मळलेल्या पायवाटे वरुनच चालणे पसंत करतील या कडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गरुड २०१० – २०१३ या कालावधीत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून काम करीत होते. या कालावधीत ” सज्जनांचा पुरस्कार, दूर्जनांवर कायदेशीर वार ” हि त्यांच्या कामकाजाची पद्धत होती. कामाच्या या पद्धतीमुळे ते सर्वसामान्य स्थानिक नागरिकांच्यामध्ये कमालीचे लोकप्रिय झाले होते. त्यांची ती लोकप्रियता आजही कायम आहे. त्यामुळे त्यांची २०१३ साली बदली झाल्यानंतर आलेल्या प्रत्येक पोलीस निरीक्षकाच्या कामगिरीची तुलना सुहास गरुड यांच्या कामगिरीशी केली जाते. सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या या तुलनेत नंतर आलेला प्रत्येक आधिकारी अनुत्तीर्ण झाला आहे. नव्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेतलेल्या दत्तात्रय चव्हाण यांच्या कारभाराची तुलना ही सर्वसामान्य नागरिक सुहास गरुड यांच्या कारभाराशी करणार हे अपरिहार्य आहे.
पुणे जिल्ह्य़ात तेरा तालुके आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहरा लगत असल्याने इतर बारा तालुक्यांच्या तुलनेत हवेली तालुक्यात नागरीकरणाचा वेग प्रचंड प्रमाणात आहे. नागरीकरणाचा वेग वाढल्याने येथील जमिनींचे बाजार भाव सोन्याच्या भावापेक्षा जास्त पटीने वाढले आहेत. परिणामी तालुक्यात सर्वत्र पैशाचा धूर निघत आहे. या पैशातून आलेली तकलादू श्रीमंती तरूणांना विचार करायला वेळच मिळू देत नाही. महागडे मोबाइल, दुचाकी, चारचाकी वाहने, सोन्याचे दागिने, ब्रॅण्डेड कपडे, सेंट, परफ्यूमस, डिओडरंट, शाॅपींग माॅलमध्ये खरेदी, हिंदी, इंग्रजी चित्रपट पाहणे, मित्रांचे वाढदिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा करणे, केक कापणे, वेगवेगळ्या प्रकारची दाढी वाढवणे, सोशल मिडियात वेगवेगळे फोटो टाकणे, डिजे तालावर बेधुंद होऊन नाचणे, व्यसनांचे सर्व प्रकार वारंवार करणे, भिन्न लिंगी व्यक्ती बरोबर प्रेम करणे या पलीकडे आजची तरुणाई जातच नाही. हे असे वागणे म्हणजेच जीवन आहे किंवा या शिवाय जीवन असूच शकत नाही अशी ठाम भूमिका घेतल्याने तरुणांचे आयुष्य बरबाद होत आहे. या तरुणाईला वठणीवर आणण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे लागणार आहे.
मात्र तरुण पिढीच्या या वागण्याला समाज म्हणून आपण सर्वच जण जबाबदार आहोत. फक्त पोलीस खात्यावर जबाबदारी ढकलून सुज्ञ, सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या समाजाला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. आजच्या तरुणाईला आदर्श वाटतील अशी व्यक्तीमत्वे फारच कमी आहेत. जी आहेत ती पडद्याआड आहेत. प्रत्येक तरुण, तरुणीच्या जडणघडणीत त्यांच्या आई वडिलांचा व घरातील इतर व्यक्तींचा व घरातील वातावरणाचा फार मोठा वाटा असतो. सध्याची आई टिव्ही वरील मालिका, ठराविक सण समारंभ व वैयक्तिक आयुष्य यात गुरफटून गेली आहे. कुटुंबात वाढत्या भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी अतिरिक्त पैशांची गरज असते. ती भागवता यावी म्हणून वडील कुठल्याही प्रकारे घरात पैसा आला पाहिजे अशा मताचे झाले आहेत. आई वडील आपापल्या गडबडीत तर विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आज्जी, आजोबा, चुलता, चुलती कुणीच घरात नाही. त्यामुळे तरूण पिढी अक्षरशः बेभान झाली आ
गेल्या काही वर्षांपुर्वी ” सिंघम ” म्हणून नावलौकिक मिळवलेले पोलीस आधिकारी सुहास गरुड या परिसरात कार्यरत होते. त्यांच्या कामाचा परिसरात दबदबा होता. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे तर होतच नव्हती. परंतु मोठी भांडणे, हाणामार्या औषधालाही नव्हत्या. परंतु आताची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती एकदम उलट आहे. त्यामुळे ना पोलीस खात्याचा किंवा आधिकार्यांचा वचक आहे ना कर्मचार्यांचा. त्यामुळे कोण तलवार घेऊन नाचतोय, कोण तलवारीने केक कापतोय. अवैध प्रवासी वाहतूक, सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय यावर नियंत्रण आणणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे या साठी कठोर कारवाई करण्याची गरज आहे. एकंदरीत हवेली तालुक्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. हि परिस्थिती सुधारण्यासाठी एका खंबीर, खमक्या, बाजीराव सिंघमची गरज आहे. अन्यथा तालुक्यातील तरुणांचे, कायदा व सुव्यवस्थेचे भवितव्य गंभीर आहे.
साहेबांचा सत्कार करणारे दोन नंबरवालेच जादा…
लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक म्हणुन चार्ज स्विकारल्यापासुन दत्तात्रेय चव्हाण यांचा सत्कार करण्यासाठी हौसे-गवसे व नवसे अशा सर्वच नागरीकांची रांग लागलेली होती व आत्ताही सत्कार करण्यासाठी लोक येत आहेत. मात्र सत्कार करणाऱ्या लोकांची यादी राहिल्यास, अनेक दोन नंबर वाल्यांनी साहेबांची ओळख व्हावी यासाठी प्रतिष्ठीत नागरीकांच्याबरोबर रांगेत हात धुवुन घेतल्याचे दिसुन येत आहे. साहेबांना भेटणाऱ्या यादीतील दोन-तीन नंबर हे कोण याची कल्पना साहेबांना नसली तरी, त्यांच्या हाताखालच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी करुन देणे गरजेचे होते.