लोणी काळभोर: खुलेआम सुरु असलेल्या जुगाराच्या (Loni Kalbhor News) अड्ड्यावर लोणी काळभोर (Pune News) पोलिसांनी शनिवारी (ता.15) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे. राहिंज वस्ती परिसरात केलेल्या या छाप्यात पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. तर या कारवाईत सुमारे 50 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अमिन अनिस पठाण (वय 18, रा. बिग बाजार जवळ, लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे), मुक्तार अख्तर शेख (वय २१ हाडके पेट्रोलपंपाचे समोर लोणी स्टेशन कदमवाकवस्ती, ता. हवेली पुणे), बॉबी रघुवीर वाघमारे (वय 18, हाडके प्लाझा, लोणी स्टेशन कदमवाकवस्ती, ता. हवेली पुणे) व सदाशिव सुंदरराव जाधव (वय 19, रा. कदमवाकवस्ती, सातदेवी मंदीराजवळ ता. हवेली जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार चेतन कुंभार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदारचेतन कुंभार हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी कर्त्यव्य बजावीत होते. तेव्हा लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील राहिंज वस्ती परिसरात खुलेआम जुगार सुरु आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा वरील चार आरोपी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे जुगार पैशांवर खेळत असताना मिळुन आले.
या छाप्यात पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी व जुगाराचे साहित्य असा 49 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरील चारही आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार निलेश कोल्हे करत आहेत.







