Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : रिक्षाचालकाची वाहतूक पोलिसांशी हुज्जत, कारवाई टाळण्यासाठी स्वतःच डोक्यात मारला दगड!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 15 November 2026, 10:31

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी फाटा पुलावर रस्त्यातच रिक्षा उभी करून प्रवासी भरणाऱ्या रिक्षाचालकाने वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहतूक पोलिसांनी रिक्षा बाजूला घेण्यास सांगून कारवाईसाठी पोलीस ठाण्यात चलण्यास सांगितले असता, कारवाई टाळण्यासाठी संबंधित रिक्षाचालकाने स्वतःच डोक्यात दगड मारून घेतल्याची घटना शनिवारी (ता. 14 ) सायंकाळी घडली आहे. त्यानंतर तो रिक्षासह घटनास्थळावरून पसार झाला.

याप्रकरणी लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी योगेश रामभाऊ काकडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालक शंकर मनोहर खंडागळे (वय 50 , रा. कदमवाकवस्ती) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 285 तसेच मोटार वाहन कायदा कलम 119 , 177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी बाजार फाटा परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने पोलीस कर्मचारी काकडे यांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी पाठविण्यात आले होते. रात्री सव्वाआठच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील पुलावर एमएच 12 एक्सएन 5397 क्रमांकाची रिक्षा उभी करून चालक प्रवासी भरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पुलावर वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीचा खोळंबा होत होता.

काकडे यांनी रिक्षाचालकाला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. तसेच पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात चलण्यास सांगितले. मात्र, संबंधित चालकाने स्वतःच्या डोक्यात दगड मारून घेतला आणि तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रिक्षा सुरू करून तो घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने पोलिसांनी संबंधित रिक्षाचालकाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरे-शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात! बसचा टायर फुटल्याने लक्झरी बस आयशरला धडकली; दोन्ही चालक गंभीर जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली!

Sunday, 15 November 2026, 17:56

पुणे पोलीस दलात खळबळ! ३० लाखांच्या जबरी चोरीप्रकरणी आणखी एका पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कुऱ्हाड

Sunday, 15 November 2026, 17:29

सोरतापवाडी येथे दिवाळीसाठी मावशीकडे आलेल्या 15 वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू; वाघोली अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला

Sunday, 15 November 2026, 16:30

नाव आणि फोटोचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई; रुपाली चाकणकर यांचा स्पष्ट इशारा!

Sunday, 15 November 2026, 16:29

पंढरपुरात भयंकर दुर्घटना! ३० फूट खोल विहिरीचे काम सुरू असताना कोसळला दगड-मातीचा ढिगारा; चार कामगार अडकल्याची भीती

Sunday, 15 November 2026, 16:09

सोन्या-चांदीच्या दरात उलथापालथ! चांदी थेट 15 हजारांनी स्वस्त; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Sunday, 15 November 2026, 15:55
Next Post

शिक्रापूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचे केस कात्रीने कापले; हात, डोके आणि पाठीवर केले वार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp