शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये १ जानेवारी रोजी होणाऱ्या शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार जनार्दन शेळके, संजू जाधव, दामोदर होळकर, अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, लखन शिरसकर, महिला पोलीस शिपाई नेहा जाधव यांनी शिक्रापूर, सणसवाडी, धानोरे, कोरेगाव भीमा येथे दारू अड्ड्यांवर छापे टाकत सणसवाडी येथे क्रांती अनिल नानावत (वय ४८, रा. सणसवाडी), सुमन सुब्रमण्यम मन्नावत (वय ३०, रा. सणसवाडी), निखील शांतीलाल शेरावत (वय २१, रा. सणसवाडी) या तिघांवर छापे टाकत दारूसाठा जप्त केला.
शिक्रापूर येथे सावित्री दिलीप कर्मावत (वय ३८, रा. शिक्रापूर), धानोरे येथे हॉटेल जेधेवाडा येथे अभिषेक सुभाष जेधे (वय २१, रा. तळेगाव ढमढेरे), कोरेगाव स्मशानभूमी जवळ पंकज रामराव शिंदे (वय ३५) व रियाज शेरखान शेख (वय ३४, रा. कोरेगाव भीमा) या दोघांवर तर बजरंगवाडी येथील हॉटेल बजरंगवाडी येथे वामन रामजी कानगे (वय ६०, रा. बजरंगवाडी, शिक्रापूर) यांच्यावर छापे टाकत त्यांच्या जवळील दारूसाठा जप्त केला.