पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाला गळती लागले आहे.. अशातच ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.. यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं होत .. त्यांच्या या टीकेला आता भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर देत टोला लगावला..काय बोलावं आता या माणसाबद्दल मुंगिरी लाल की हसीन सपने याप्रमाणे संजय राऊत बोलतो आहे.. असा जोरदार टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फक्त दोन तासांसाठी ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील, असा हल्लाबोल केला होता.. यावर आता भाजपाचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे.. संजय राऊत हा सध्या जोकरच्या भूमिकेत आहे.. सकाळपासून ते काहीही बडबडत आहेत.. शेखचिल्ली सारखे प्रकार त्यांचे चालले आहे. वाटेल ते बरळायचं…’, असं म्हणत गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर घनाघात केला आहे.
दरम्यान दुसरीकडेकोकणात ऑपरेशन टायगर ची जास्ती ठाकरे गटाला बसली असून ठाकरे गटाने तडकाफडकी निर्णय घेत कोकणातील प्रमुख तीन नेत्यांची हकालपट्टी केली आहे..ठाकरे गटाने रत्नागिरी जिल्ह्यातील सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळुण-संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांची पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे ठाकरे गटाने पक्षातून हाकालपट्टी केली आहे