ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर हद्दीतील डुंबरे मळा येथे लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी रविवारी (दि. ५) जेरबंद करण्यात आली आहे. तिचे वय ६ वर्षे इतके आहे. वारंवार होणाऱ्या दर्शनामुळे या भागात दहशत पसरली होती. त्यामुळे ओतूर वनविभागाने डुंबरे मळा परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. उपसरपंच प्रशांत डुंबरे व स्थानिक ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती.
बिबटा पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले, किसन केदार, गणपत केदार, गंगाराम जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्यास ताब्यात घेऊन माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल केले.
जयप्रकाश डुंबरे, प्रकाश डुंबरे, सागर डुंबरे, विकास डुंबरे, संभाजी डुंबरे, संजय डुंबरे या ग्रामस्थांनी रात्री विबटप्रवण क्षेत्रातून वाहन घेऊन जाताना हॉर्न मोठ्याने वाजवावा. जेणेकरून रस्त्याच्या आजूबाजूला दबा धरून बसलेले वन्यप्राणी बाजूला सरकतील. रात्री शेतीचे कामे करीत असताना हातात काठी किंवा बॅटरी असावी. शक्यतो समूहाने शेतात काम करावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.