योगेश मारणे
शिरूर : पिंपळसुटी (ता.शिरूर) येथील एका लहान चिमुकलीवर बिबट्याने आज (दि.२४) सायंकाळच्या सुमारास हल्ला केल्याची घटना घडली आहे. ज्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला आहे, ती लहान मुलगी अद्यापपर्यंत सापडलेली नाही.
शिरूर तालुक्यात बिबट्याचे लहान मुलांवर होणारे हल्ले ही बाब अतिशय दुर्दैवी व धक्कादायक आहे. अजून किती बळी गेल्यावर वन विभाग व शासनाला जाग येणार? अशी विचारणा शिरूरच्या पूर्व भागातील नागरिकांमधून केली जात आहे.