नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोनसह अनेक गॅजेट्स आणले जात आहेत. त्यात Earbuds ची मागणी वाढली आहे. ही गरज लक्षात घेता भारतीय कंपनी Lava ने स्वस्तातील Earbuds लाँच केले आहेत. Lava Probuds T24 असे या Earbuds चे नाव आहे.
कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये TWS लाँच केले आहे, जो Lava Probuds सीरिजचा एक भाग आहे. कंपनीने Lava Probuds T24 लाँच केला आहे. हा एक इन-इयर स्टाईल बड आहे, जो 10mm ड्रायव्हर आणि क्वाड माईकसह येतो. यामध्ये ENC ची सुविधाही देण्यात आली आहे, जी तुम्हाला कॉल गुणवत्ता चांगली देईल. यात हाय बास पॉलीयुरेथेन डायफ्राम स्पीकर्स आहेत. याच्या मदतीने तुम्हाला उत्तम ऑडिओ अनुभव मिळेल.
हा डिव्हाईस ब्लूटूथ 5.4 कनेक्टिव्हिटीसह मिळत आहे. यामध्ये तुम्हाला टच कंट्रोल्स देखील मिळतील. बजेट श्रेणीनुसार ही उत्तम फीचर्स आहेत. Lava Probuds T24 मध्ये क्वाड माईक सेटअप देण्यात आला आहे, ज्यामुळे युजर्सला कॉलिंगचा चांगला अनुभव मिळेल. याशिवाय, कंपनीने त्यात नॉईज कॅन्सलेशन ऑप्शनही दिला आहे. यात 500mAh बॅटरीही देण्यात आली आहे. त्याचा बॅकअपही चांगला मिळत आहे.
तुम्ही हा Earbuds लावाच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. त्याची किंमत 1299 रुपये आहे. हा Earbuds आजपासून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.