Land Regristration: ग्रामीण तसेच शहरी (Occupant Class 1 Land) भागात जमीन खरेदी-विक्री, बांधकाम किंवा बँक कर्ज व्यवहार (Occupant Class 2 Land) करताना जमीन वर्ग-1 आणि जमीन वर्ग-2 हे शब्द नेहमी (Bhogawatdar Land) ऐकायला मिळतात. अनेक शेतकरी (Land Rules) आणि जमीनधारकांकडे वर्ग-2 जमीन असल्यामुळे (Land 7/12) व्यवहार करताना अडचणी येतात. त्यामुळे वर्ग-2 जमीन वर्ग-1 मध्ये कशी रूपांतरित करायची, याची माहिती असणे महत्त्वाचे ठरते. (Breaking News)

शासनाची पूर्वपरवानगी
महसूल नियमांनुसार वर्ग-1 जमीन म्हणजे पूर्ण मालकी हक्काची जमीन. या जमिनीवर मालकाला विक्री, खरेदी, गहाण, वारसा आणि बांधकाम करण्याचा पूर्ण अधिकार असतो. तर वर्ग-2 जमीन ही अटींसह दिलेली जमीन असते. ही जमीन शासनाकडून दिलेली, इनाम जमीन, पुनर्वसनासाठी दिलेली किंवा काही अटींवर मिळालेली असते. वर्ग-2 जमिनीची थेट विक्री किंवा हस्तांतरण करता येत नाही. त्यासाठी शासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. (Marathi News)
काय आहेत नियम
वर्ग-2 जमीन वर्ग-1 मध्ये रूपांतर करण्यासाठी जमीनधारकाने संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो. जमीन ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्याच्या तहसीलदारांकडे हा अर्ज सादर करावा लागतो. अर्जामध्ये गट नंबर, क्षेत्रफळ, गावाचे नाव, तालुका, जिल्हा आणि जमिनीचा संपूर्ण तपशील नमूद करणे आवश्यक असते. (Agriculture Land)
महत्वाचे कागदपत्र
अर्जासोबत 7/12 उतारा, 8-अ उतारा, फेरफार नोंदी, मूळ वाटप आदेश उपलब्ध असल्यास त्याची प्रत, ओळखपत्र, रहिवासी दाखला आणि आवश्यक असल्यास प्रतिज्ञापत्र जोडावे लागते. अर्ज प्राप्त झाल्यानंतर तहसील कार्यालयामार्फत जमिनीची चौकशी केली जाते. जमिनीवर कोणताही शासकीय वाद, कर्ज, न्यायालयीन प्रकरण आहे का, याची तपासणी केली जाते.
अर्ज प्रक्रिया
सर्व बाबी योग्य आढळल्यास प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जातो. जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर शासनाने ठरवलेली रूपांतरण फी किंवा नजराणा भरावा लागतो. ही रक्कम जमिनीच्या बाजारभावानुसार ठरवली जाते. फी भरल्यानंतर 7/12 उताऱ्यावर वर्ग-1 अशी नोंद केली जाते.
मालकी हक्क केव्हा मिळतो
रूपांतर पूर्ण झाल्यानंतर जमीन वर्ग-1 म्हणून नोंदवली जाते आणि जमीनधारकाला त्या जमिनीवर पूर्ण मालकी हक्क मिळतो. त्यानंतर तो जमीन कायदेशीररित्या विक्री, गहाण किंवा अन्य व्यवहारासाठी वापरू शकतो. मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने अर्ज करताना सर्व कागदपत्रे अचूक आणि पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे.






