पुणे : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याची महिलांना प्रतिक्षा लागली होती. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणे सहावा हप्ता मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता याच आठवड्यात दिला जाणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या अकाऊंटला पैसे जमा केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते. त्यानंतर आता ही प्रक्रिया सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेत सहावा हप्ता वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे.
लाडकी बहीण योजनेत 35 लाख महिलांना पैसे दिले जाणार आहेत. या योजनेसाठी 3500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सहावा हप्ता येणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आता पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात होणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणे 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे.