पुणे : बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे राखी पोर्णिमा अर्थात ‘रक्षाबंधन’ होय. या सणाच्या भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
हिंदू धर्मात रक्षाबंधन हा भावाबहिणींचा सण म्हणून ओळखला जातो. बहीण भावाला राखी बांधते. राखी अर्थात हा नक्कीच साधासुधा धागा नाही. यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत. भावाने बहिणीला तिच्या रक्षेचे दिलेले वचन हे खूपच महत्त्वाचे असते. दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन येते. यावर्षी रक्षाबंधन हे उद्या गुरुवारी (ता,११) आहे.
रक्षाबंधनाचा शुभमुहर्त हा गुरुवारी ११ ऑगस्ट २०२२ रोजी आहे. सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होईल. आणि दुसऱ्या दिवशी १२ ऑगस्ट २०२२ ला सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी समाप्त होईल.
सुतकातील राखीचा सण ”अशा” प्रकारे साजरा करा
सुतकादरम्यान भावंडांची इच्छा असल्यास ते रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकतात. मात्र यामध्ये धार्मिक विधींचा समावेश होणार नाही याची काळजी घ्या. बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधू शकतात पण टिळा आणि कुंकू लावत नाहीत. भावाची आरतीही करू नका. या दरम्यान पायांना स्पर्श करूनही नमस्कार केला जात नाही, म्हणून केवळ हात जोडून नमस्कार करावा. भाऊ किंवा बहीण, जो कोणी लहान असेल त्याला नमस्कार करून मोठ्यांनी आशीर्वाद द्यावा. सूतका दरम्यान रक्षाबंधन साजरे करतांना मनातल्या मनात
मंत्र म्हणावे. मंत्राचे उच्चारण न करता राखी बांधावी किंवा बांंधून घ्यावी.