Tuesday, April 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Khashaba Jadhav : खाशाबा जाधवांना ‘पद्मविभूषण’ देण्याबाबत निर्णय घ्या ; उच्च न्यायालयाचा केंद्राला आदेश..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 21 April 2026, 19:12

कोल्हापूर : स्वातंत्र्योत्तर भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ बहाल करण्याच्या मागणीवर आता न्यायालयाने ठोस भूमिका घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने केंद्र सरकारला 20 दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश देत 4 मे 2026 पूर्वी सकारात्मक भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तब्बल 74 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सन्मानाला न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

या संदर्भात ‘कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशन’ने नोव्हेंबर 2025 मध्ये याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारच्या विलंबावर नाराजी व्यक्त करत इतक्या मोठ्या ऐतिहासिक कामगिरीकडे दुर्लक्ष होणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. सरकारच्या दिरंगाईमुळेच हा सन्मान इतकी वर्षे रखडल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले.

जाधव यांना योग्य सन्मान मिळावा यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी दीर्घकाळ संघर्ष केला आहे. विशेषतः त्यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. 2017 मध्ये पद्मविभूषणसाठी पाठवलेली शिफारस फाईल हरवल्याची बाब समोर आल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. राज्य सरकारकडून आश्वासन मिळूनही प्रत्यक्षात कार्यवाही न झाल्याने अखेर न्यायालयात धाव घेण्यात आली.

खाशाबा दादासाहेब जाधव हे भारतीय कुस्तीतील एक दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व होते. 15 जानेवारी 1926 रोजी सातारा जिल्ह्यातील गोलेश्वर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांकडूनच कुस्तीचे धडे घेत त्यांनी पुढे कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आपल्या खेळाला धार दिली.

1948 च्या लंडन ऑलिम्पिक 1948मध्ये अपयश आल्यानंतरही त्यांनी जिद्द सोडली नाही. 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिक 1952मध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. जर्मनी, कॅनडा आणि मेक्सिकोच्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत त्यांनी स्वतंत्र भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले.

दरम्यान, 14 ऑगस्ट 1984 रोजी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या योगदानाला योग्य तो सन्मान मिळावा, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. आता न्यायालयाच्या आदेशामुळे या मागणीला नवे बळ मिळाले असून, केंद्र सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Khashaba Jadhav : खाशाबा जाधवांना ‘पद्मविभूषण’ देण्याबाबत निर्णय घ्या ; उच्च न्यायालयाचा केंद्राला आदेश..

Tuesday, 21 April 2026, 19:12

Pune fraud : “एमबीबीएस प्रवेशाचे आमिष; जुळ्या मुलींच्या नावाखाली 5 लाखांची फसवणूक!” एड्युव्हिओ कंपनीविरुद्ध गुन्हा

Tuesday, 21 April 2026, 19:07

Pune News : कमी उंचीमुळे पोलीस भरती हुकली, पण समाजात मिरवण्यासाठी रचला खोटा बनाव ; नऱ्हे पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

Tuesday, 21 April 2026, 18:46

Lenskart : “लेन्सकार्टच्या ‘ग्रुमिंग गाईड’वरून वाद पेटला!” टिळा-टिकलीवरील कथित निर्बंधांवर मनसे आक्रमक; हवेली तालुक्यात तीव्र निषेध

Tuesday, 21 April 2026, 18:26

सुप्रिया सुळेंचे सुनेत्रा पवारांसाठी मतदानाचे आवाहन ; अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याची साद, शारदा’ प्रांगणातील सांगता सभेत सुळे भावूक

Tuesday, 21 April 2026, 18:10
Government Employee Strike for old pension scheme on 19 november

राज्यातील 17 लाख कर्मचारी आजपासून संपावर ; जुनी पेन्शन आणि रिक्त पदे भरण्यासह 18 प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही…

Tuesday, 21 April 2026, 17:47
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.