Katraj Dairy : पुणे, : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज डेअरीमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी (ता. 25) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय समोर आला. Katraj Dairy

स्व. माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या सूचनेनुसार कात्रज डेअरीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांवर दरवर्षी वेगवेगळ्या तालुक्यातील संचालकांना संधी देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पदाधिकारी बदलाबाबत सूचना देण्यात आल्याने बैठकीत या विषयावर जोरदार चर्चा झाली. Katraj Dairy
दरम्यान, काही पदाधिकाऱ्यांनी तत्काळ राजीनामा देण्यास सुरुवातीला विरोध दर्शवल्याने संचालकांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे यांनी व्यवस्थापकीय संचालकांच्या नावे असलेला राजीनामा खासदार पार्थ पवार यांच्याकडे सुपूर्द केला. “पार्थ पवार जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल,” अशी भूमिका ढमढेरे यांनी स्पष्ट केली. मात्र, व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी अद्याप अधिकृत राजीनामा प्राप्त झालेला नसल्याचे सांगितले. Katraj Dairy
दरम्यान, मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पुढील आठ ते नऊ महिन्यांसाठी नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची की अनुभवी संचालकांवर विश्वास ठेवायचा, याबाबत अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. Katraj Dairy







