Monday, August 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापुरात वडाच्या झाडाला मिळाले ‘नवजीवन’; पडलेल्या 30 वर्षीय वृक्षाचे यशस्वी पुनर्वसन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 10 June 2026, 13:07

आदित्य बोराटे 

इंदापूर: जून महिन्यात आलेल्या वादळामुळे मुळासकट उन्मळून पडलेल्या सुमारे 30 वर्षीय जुन्या वडाच्या झाडाला नवजीवन देण्यात नगरपरिषदेच्या उद्यान विभागाला यश आले आहे. समाजातील काही अपप्रवृत्तींकडून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असतानाच,नगराध्यक्ष भरत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अक्षय सूर्यवंशी आणि पर्यावरण प्रेमींनी एक वडाचं झाड वाचवून नवा आदर्श घालून दिला.

अकलूज रस्त्यालगत असलेला अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाचा वडाचा वृक्ष पडल्याची माहिती मिळताच नगरसेवक अक्षय सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून हा वृक्ष संत तुकाराम महाराज पालखी तळ परिसरात पुनर्प्रस्थापित करण्यात आला. विशेष यंत्रसामग्रीच्या साह्याने वृक्ष सुरक्षितपणे हलवून नव्या ठिकाणी लावण्यात आला.

 

या उपक्रमावेळी नगरसेवक अक्षय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून संपूर्ण कामावर लक्ष ठेवले. योग्य निगा आणि संवर्धनामुळे या वृक्षाला पुन्हा नवीन पालवी फुटून तो पूर्वीप्रमाणे बहरून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला.

नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, इंदापूर नगरपरिषदेच्या इतिहासात इतक्या मोठ्या वृक्षाची पुनर्लागवड करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असून, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या उपक्रमासाठी वृक्षप्रेमी सामाजिक संस्था परिवाराचे कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते धरमचंद लोढा, बाळासाहेब उंबरे, चैतन्य वाघमोडे, सौरभ उंबरे, संस्कार पलंगे, आर्यमान गाणबोटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.नगरपरिषद उद्यान विभागाचे अशोक चिंचकर, अंबादास नाळे, अल्ताफ पठाण यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.

पर्यावरण संवर्धनासाठी समाज आणि प्रशासन एकत्र आल्यास पडलेल्या वृक्षालाही नवजीवन देता येते, हा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. ‘झाडे वाचवा, जीवन वाचवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार करणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

खासगी गाड्यांवर ‘पोलीस’ लिहिलंय का? तर मग बसणार मोठा दणका; वाहतूक विभागाचे कठोर कारवाईचे आदेश

Monday, 3 August 2026, 19:28

कोरेगाव मूळ येथे येथील मुळा-मुठा बंधाऱ्यावरून बिवरीतील एकजण गेला वाहून; 15 दिवसांपूर्वी ‘पुणे प्राईम न्यूज’कडून धोक्याचा व्हिडिओ प्रसारित, तर आज दुर्घटना, प्रशासनाचा अद्याप पत्ता नाही..

Monday, 3 August 2026, 19:25

कोरेगाव मूळमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..

Monday, 3 August 2026, 18:42

महिला PMPMLमध्ये चढली, प्रवाशांची कोंबाकोंब अन् गर्दीचा फायदा घेत घडलं भयंकर; सरळ पोलीस स्टेशन गाठलं अन्…

Monday, 3 August 2026, 18:06

कदमवाकवस्तीत घरफोडी! उघड्या दरवाजाचा फायदा घेत चोरट्यांचा डल्ला; तब्बल ८ लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास

Monday, 3 August 2026, 17:30

उरुळी कांचनमध्ये ‘ओपन जेवू देईना, अन् क्लोज झोपू देईना’; पोलिसांच्या छुप्या आशीर्वादाने अवैध धंदे जोरात?, उद्ध्वस्त होणाऱ्या संसारांकडे पोलीस यंत्रणेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष…

Monday, 3 August 2026, 17:28
Next Post

कामगाराने मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून मालकाला बेदम मारहाण, दूध डेअरीवर केला हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.