दौंड (पुणे): दौंड तालुक्यातील मौजे कासुर्डी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मावस बहिणीच्या लग्नासाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला आहे. हि दुर्घटना (दि. 11) जून रोजी सायंकाळी पाच वाजता कासुर्डी येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुदाम दगडू ठोंबरे यांची मुलगी सुहानी तुषार तमनर (रा.विश्रांतवाडी) हि मावस बहिणीच्या लग्नासाठी कासुर्डी येथे तिच्या माहेरी आली होती. मावस बहिणीचे लग्न असल्याने आई वडिलांबरोबर बुधवारी (दि. 12 जून) लग्नाला जाण्यासाठी ती कासुर्डी येथे मंगळवारी (दि.11) दुपारीच माहेरी आली होती.
मंगळवारी (दि.11) पाऊस येण्यापुर्वीच शेतामधून जनावरांना चारा घास गवत घेऊन येतो असे म्हणत, सुहानीचा भाऊ शंकर सुदाम ठोंबरे शेताकडे निघाला होता. तेव्हा सुहानीसुद्धा भावासोबत गेली. बहिण-भाऊ दोघे ट्रॅक्टरमधून निघाले. संतोजी बुवा मंदिराच्या बाजूला असलेल्या त्यांच्या शेतामध्ये गेले.
या वेळी पाऊस सुरु झाल्यामुळे ट्रॅक्टर बाजूला उभा करून बंद करण्यापुर्वी सुहानी ट्रॅक्टर मधून खाली उतरून काही अंतरावर पुढे चालली असताना अचानक आभाळातून जोरदार वीज कडाडून सुहानीच्या अंगावर कोसळली. यावेळी विजेच्या जोरदार धक्क्याने सुहानी खाली पडून तिचा जागीच मृत्यू झाला. हि दुर्घटना 11 जून 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता कासुर्डी येथे घडली आहे. सुहानीचे (दि 12) जून रोजी