Kareena Kapoor :मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान बेबो आता दाक्षिणात्य सिनेमामध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. तिने 24 वर्षांपूर्वी दाक्षिणात्य सिनेमातून सिने सृष्टीत पदार्पण केले होते. ‘रिफ्यूजी’ हा तिचा पहिला सिनेमा होता. तेव्हापासून तिच्या बॉलिवूड सिनेमांमधील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
करिना कपूर केजीएफ स्टार यशसोबत नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीचं यशने एका नव्या प्रोजेक्टची घोषणा केली होती. टॉक्सिक असे नव्या प्रोजेक्टचे नाव आहे. हाही केजीएफप्रमाणे सर्वांच्या पसंतीस उतरेल अशी आशा प्रेक्षक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, दिग्दर्शक गीतू मोहनदास हीच यशच्या नव्या प्रोजेक्टचे दिग्दर्शन करणार आहे. यशच्या सिनेमांनी आजवर नेहमीच बंप्पर कमाई केली आहे. टॉक्सिक सिनेमातील कास्टही मोठी आहे. आता यश आणि करिना कपूर एकत्रित येणार असल्याने हा सिनेमाही तुफान कमाई करेल, असे बोलले जात आहे.
‘जानेजा’मधील भूमिका चर्चेत
सरत्या वर्षात करीनाचा जानेजा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी तुफान पसंती दिली आहे. करीनाने आजवर अनेक हिट सिनेमे दिले आहेत. मात्र, जानेजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये चर्चेत आली होती.