मुंबई : कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यादरम्यान, पोलीसांनी या घटनेतील आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे. याप्रकरणी विशाल गवळीच्या पत्नीला देखील पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेसंदर्भात आरोपीच्या पत्नीने पोलीसांना धक्कादायक खुलासा केला आहे. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे.
असा घडला भयानक प्रकार, आरोपीच्या पत्नीनेच केला धक्कादायक खुलासा…
आरोपी विशाल गवळीने सायंकाळी पाच वाजता अल्पवयीन मुलीला घरात घेऊन गेला. पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य करून तिची हत्या केली. त्यानंतर विशालने एका मोठ्या बॅगमध्ये मुलीचा मृतदेह टाकून ठेवला होता. सायंकाळी एका खाजगी बँकेत काम करणारी त्याची पत्नी घरी आली तेव्हा घडलेला प्रकार आरोपीने पत्नी साक्षीला सांगितला. हे ऐकताच साक्षीला धक्का बसला. दोघे पती पत्नीने एकत्र बसून आधी घरातले रक्त पुसले त्यानंतर या मृतदेहाचे काय करायचे याबद्दल विचार केला. रात्री साडेआठ वाजता मित्राची रिक्षा बोलावून घेतली. रात्री नऊ वाजता बापगावच्या दिशेने रवाना झाले. मृतदेह फेकून दोघे परतले. त्यानंतर विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तेथून आपल्या पत्नीच्या घरी बुलढाणा येथे निघून गेला. पत्नी साक्षी येथेच राहिली. घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशालने हे कृत्य केल्याचा संशय आला. पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेत चौकशी केली आणि तिने हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीसांनी विशालला पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
नेमकं काय घडलं?
कल्याण शहरातील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित मुलगी सोमवारी संध्याकाळपासून घरातून बेपत्ता झाली होती. बराच शोध घेऊनही ती न सापडल्याने तिच्या कुटुंबीयांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला असता तिचा मृतदेह एका गटारात सापडला.