लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर ता. (हवेली) येथील सिरम कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कैलास दत्तात्रय थेऊरकर (वय- ४६) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी (ता. ०२) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, असा मोठा परिवार आहे.
लोणी काळभोर येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात त्याचे शिक्षण झाले होते. शिक्षण झाल्यापासून गेली 25 वर्षापासून लोणी काळभोरसह परिसरात विविध कामात सक्रिय कार्यकर्ते म्हणूनहि ते कार्यरत होते.
लोणी काळभोरसह परिसरातील वित्तीय संस्थेत मार्गदर्शनहि करीत होते. त्यांच्या जाण्याने लोणी काळभोरसह परिसरात शोककळा पसरली आहे.