Junnar News शिरूर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने भाताची अवनी सूरू झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Junnar News)
जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात पारंपरिक पद्धतीने भात लागवड केली जाते. त्यासाठी शेतकरी एप्रिल-मे महिन्याच्या सुरवातीपासून कामाला सुरवात करतात. भात खाचरात राब टाकणे, भाजणी करणे नंतर जूनच्या सुरवातीला पाळी घालून भात बियाणे धुळवाफ्यावर पेरले जाते. मात्र, जर पाऊस वेळेवर झाला नाही, तर नुकसानीची शक्यता अधिक असते. तसेच यासाठी लागणारा वेळ व मजुरी खर्चात देखील त्यामुळे वाढ होते.
यावर्षी देखील जून महिण्यात पाऊस झालाच नाही. त्यानंतर जुलै महिण्याच्या सरतेशेवटी पाऊस सुरू झाला आहे. पाऊसाच्या संततधारेमुळे शेतात पाणी साचू लागले आहे. त्यामुळे दोन ते तिन दिवसापासून भाताची अवनीचे काम सुरू झाले असल्याची माहिती खडकुंबे येथील शेतकरी अनंता घारे व लताबाई घारे यांनी दिली.