पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नागपुरातील डॉ. जी. एम. ताओरी सिम्स हॉस्पिटल येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
डॉ. जी. एम. ताओरी सिम्स हॉस्पिटल, नागपूर येथे फिजिओथेरपिस्ट आणि मेल अटेंडंट या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, hrmanager@ciimsnagpur.com येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://ciimsnagpur.com/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : फिजिओथेरपिस्ट आणि मेल अटेंडंट (पुरुष परिचर)
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, बी.पी.वी.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल) .
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 नोव्हेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : hrmanager@ciimsnagpur.com