पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, आता नागपुरातील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार असून, या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://vnit.ac.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो (JRF).
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : [email protected] and [email protected]