पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पुण्यातील प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था येथे ज्युनियर रिसर्च फेलो (जेआरएफ) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, [email protected] येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://diat.ac.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो (जेआरएफ).
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– शैक्षणिक पात्रता : बी.ई. / बी. टेक. / एम. एससी. नेट / गेट किंवा एम.ई. / एम.टेक सह पदवीधर आणि पदव्युत्तर.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 37,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 28 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट).
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2024.