पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. पण आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र शैक्षणिक सेवा येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र शैक्षणिक सेवा येथे विधि अधिकारी (गट-अ) आणि प्रबंधक (गट-अ) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला राज्यभरात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 13 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : विधि अधिकारी (गट-अ) आणि प्रबंधक (गट-अ).
– एकूण रिक्त पदे : 13 पदे.
– नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र.
– शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 67,700 /- ते रु. 2,15,900 /- पर्यंत.
– वयोमर्यादा : 18-55 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://www.mpsc.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.