पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता महाराष्ट्र शासनाच्या मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत घरबसल्या अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन येथे उपसंचालक-प्रकल्प, सहायक संचालक-पर्यावरण पर्यटन, सहाय्यक संचालक-प्रशासन, प्रमुख (GIS सेल), GIS विशेषज्ञ, सर्वेक्षक, स्थापत्य अभियंता आणि क्षमता निर्माण अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, [email protected] येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. यासाठी 9 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : उपसंचालक- प्रकल्प, सहायक संचालक- पर्यावरण पर्यटन, सहाय्यक संचालक- प्रशासन, प्रमुख (GIS सेल), GIS विशेषज्ञ, सर्वेक्षक, स्थापत्य अभियंता आणि क्षमता निर्माण अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 08 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी संचालक कार्यालय, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, 302, वेकफिल्ड हाऊस, तिसरा मजला, बॅलार्ड इस्टेट, ब्रिटानिया अँड को रेस्टॉरंट, मुंबई 400001.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://mangroves.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.