पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO, पुणे येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत सल्लागार या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी [email protected] या मेल आयडीवर अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.drdo.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सल्लागार.
– एकूण रिक्त पद : 1 पद
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 40,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 63 वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 11 नोव्हेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 डिसेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : महासंचालक (एसीई), डीजी (एसीई) कार्यालय, एआरडीई कॅम्पस, पाषाण, पुणे 411 021.