पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी’मध्ये रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी’मध्ये ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) आणि सीनियर रिसर्च फेलो (SRF) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 5 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://diat.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) आणि सीनियर रिसर्च फेलो (SRF).
– एकूण रिक्त पदे : 05 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 37,000/- ते रु. 42,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज पाठवण्याचा ई–मेल : [email protected]