पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे तांत्रिक अधिकारी, नोडल अधिकारी एकल केंद्र, कृषी तज्ञ, विकास तज्ञ, स्टेनो या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला गडचिरोली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत पाच रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 ही असणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील आवक जावक शाखा येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://gadchiroli.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.