पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन अर्थात घरबसल्या अर्ज करता येणार आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर येथे प्रकल्प व्यवस्थापक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चंद्रपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, [email protected] येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.mahaforest.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रकल्प व्यवस्थापक.
– नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर.
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर.
– वेतन/ मानधन : 30,000 रुपये दरमहा.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 27 नोव्हेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 डिसेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : [email protected]