पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत घरबसल्या अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर येथे स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ आणि रेडिओलॉजिस्ट या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सोलापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, [email protected] येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. यासाठी 31 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://zpsolapur.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.