पुणे : बीड येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे आता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड येथे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला बीड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://beed.gov.in/या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी.
– नोकरीचे ठिकाण : बीड.
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 75,000/- ते रु. 85,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 58 वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 07 जानेवारी 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा निवड समिती, तथा जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.