पुणे : पुण्यातील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत आता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, आता काही रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट – I (नॉन-मेडिकल) आणि प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 28000 ते 56000 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.nari-icmr.res.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट – I (नॉन-मेडिकल) आणि प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर, पदव्युत्तर पदवी.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 28,000/- ते रु. 56,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 35 वर्षे.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 06 जानेवारी 2025.
– मुलाखतीची पत्ता : ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजीचे सभागृह आणि एड्स, संशोधन, क्रमांक 73, जी-ब्लॉक, भोसरी, पुणे-411026.