पुणे : मुंबईतील MGM न्यू बॉम्बे हॉस्पिटल येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी कोणत्याही माध्यमातून अर्ज करता येऊ शकणार आहे.
MGM न्यू बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे रेडिएशन सेफ्टी ऑफिसर, फिजिसिस्ट, रेडिएशन थेरपी टेक्नॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, फार्मासिस्ट, नर्सिंग स्टाफ, मेडिकल आणि सर्जिकल ऑन्को नर्स, मार्केटिंग मॅनेजर, ऑन्कोलॉजी सेंटरचे व्यवस्थापक, तंत्रज्ञ अनुभवी प्रशासकीय कर्मचारी, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, ड्युटी मेडिकल ऑफिसर, क्लिनिकल को-ऑर्डिनेटर, फिजिशियन असिस्टंट, देखभाल कर्मचारी यांसारख्या पदांवर भरती केली जाणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नवी मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://mgmhospitalvashi.net/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 नोव्हेंबर 2024 असणार आहे. तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असल्यास वैद्यकीय संचालक/संचालक एमजीएम न्यू बॉम्बे हॉस्पिटल, वाशी प्लॉट क्रमांक 35, सेक्टर-3, वाशी, नवी मुंबई – 400 703 या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास [email protected] या ई-मेल आयडीवर अर्ज करता येणार आहे.