पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे प्रकल्प सल्लागार, प्रकल्प समन्वयक, संशोधन सहयोगी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.muhs.ac.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रकल्प सल्लागार, प्रकल्प समन्वयक, संशोधन सहयोगी.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– वयोमर्यादा : प्रकल्प सल्लागार : 55-65 वर्षे, प्रकल्प समन्वयक : 45-55 वर्षे, संशोधन सहयोगी : 30-40 वर्षे
– वेतन / मानधन : दरमहा प्रकल्प सल्लागार : 1,50,000/-, प्रकल्प समन्वयक : 64,000/-, संशोधन सहयोगी : 47,000/- .
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 12 सप्टेंबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ दिंडोरी रोड, म्हसरुळ, नाशिक ४२२ ००४.