पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, ‘महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड’ येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करता येणार आहे. यातील विशेष बाब म्हणजे पदवीधर उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत.
‘महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड’ येथे महाव्यवस्थापक, प्रादेशिक प्रशासक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी अर्ज करण्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे, अमरावती येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 70,000 ते 80,000 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://mescoltd.co.in/अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : महाव्यवस्थापक, प्रादेशिक प्रशासक.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे,अमरावती.
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 70,000/- ते रु 80,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑक्टोबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता : [email protected]
– अर्ज सादर करण्याचा पत्ता : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. पुणे (मेस्को) दुसरा मजला रायगड इमारत, घोरपडी, पुणे-४११००१.