पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, गेनबा सोपानराव मोजे कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
गेनबा सोपानराव मोजे कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि लिपिक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया..
– पदाचे नाव : प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि लिपिक.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 दिवसांच्या आत.
– अर्ज पाठवण्याचा ई–मेल आयडी : [email protected]
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://gsmozecop.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.