पुणे : चंद्रपूर येथील वन विभागात नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन माध्यमातून निवड केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 75 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
चंद्रपूर येथील वन विभागात ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. निसर्ग शिक्षणाधिकारी हे पद आता भरले जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चंद्रपूर जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यात निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या पदासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून, 45 वर्षे अशी ही वयोमर्यादा असणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, [email protected] या ई-मेल आयडीवर हा अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://mahaforest.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.