नवी दिल्ली : बँकेत नोकरी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी प्रयत्नही असतो. पण हा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
अशी असेल भरती प्रक्रिया…
पदाचे नाव – प्रोबेशनरी ऑफिसर (परिविक्षाधीन अधिकारी)
एकूण पदांची संख्या – 2000 पदे. यामध्ये सामान्य 810, ओबीसी 540, ईडब्ल्यूएस 240, एससी 300, एसटी 150 राखीव आहेत.
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा काय – 21 ते 30 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
नोकरीचे ठिकाण – मुंबई.
अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2023.
अर्ज शुल्क –
सामान्य / EWS/OBC उमेदवारांसाठी – 750 रुपये
SC/ST/PwBD उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही
कुठं करावा अर्ज?
https://ibpsonline.ibps.in/sbipoaug23/ या वेबसाईटवरून अर्ज करता येऊ शकणार आहे.