पुणे : नागपूर येथील पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर येथे पशुवैद्यकीय अधिकारी, जीआयएस तज्ञ, डेटा विश्लेषक, जेआरएफ, वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर, जीवशास्त्रज्ञ, सौर तंत्रज्ञ, इकोटूरिझम समन्वयक, जल प्रकल्प मदतनीस या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 11 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : पशुवैद्यकीय अधिकारी, जीआयएस तज्ञ, डेटा विश्लेषक, जेआरएफ, वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर, जीवशास्त्रज्ञ, सौर तंत्रज्ञ, इकोटूरिझम समन्वयक, जल प्रकल्प मदतनीस.
– एकूण रिक्त पदे : 11 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 13 डिसेंबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : हरिसिंग वन सभागृह, सेमिनरी हिल्स, नागपूर.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://mahaforest.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.