पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’, मुंबई येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
मुंबईच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’ येथे ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही 6 जानेवारी 2025 रोजी घेतली जाणार आहे. ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
संबंधित उमेदवारांना मुलाखतीसाठी फार्मा कॉन्फरन्स रूम, फार्मास्युटिकल विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, एन.पी. मार्ग, माटुंगा, मुंबई 400019 येथे मुलाखतीसाठी जावे लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.ictmumbai.edu.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.