job alert : पुणे : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामध्ये काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये एकूण 12 रिक्त पद भरले जाणार आहे. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सिस्टम अॅनालिस्ट, विधी अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, हार्डवेअर अॅण्ड नेटवर्क टेक्निशियन यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी 27 आणि 28 डिसेंबर 2023 या कालावधीत मुलाखतीसाठी जावं लागणार आहे. आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांना यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून, 45 वर्षापर्यंत वय असणारा उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सिस्टम अॅनालिस्ट, विधी अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, हार्डवेअर अॅण्ड नेटवर्क टेक्निशियन, तंत्रज्ञ ‘अ’, तंत्रज्ञ ‘ब’ , तंत्रज्ञ ‘क’, तंत्रज्ञ ‘ड’, लिफ्ट मेकॅनिक, कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्टुडिओ असिस्टंट, संगणक प्रयोगशाळा सहाय्यक.
– एकूण रिक्त पदे: 12 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– वेतन / मानधन : रु. 15,000/- ते रु. 40,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 18-45 वर्षे.
– निवड प्रक्रिया : मुलाखत (Walk-in-Interview)
– मुलाखतीची तारीख : 27 आणि 28 डिसेंबर 2023.
– मुलाखतीचा पत्ता : जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर चौक ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर – ४४००३३.
– या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.nagpuruniversity.org/ वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.