Job Alert : पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, आर्मी लॉ कॉलेज, पुणे येथे विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रकियेंतर्गत ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पुण्यात आर्मी लॉ कॉलेज येथे प्लेसमेंट सेल असिस्टंट, लिपिक, शैक्षणिक लिपिक, नेटवर्क प्रशासक, लेखापाल, सहायक प्राध्यापक (कायदा), प्लेसमेंट अधिकारी, कॉलेज संचालक शारीरिक शिक्षण आणि क्रीडा, प्रशासन अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत अर्ज करण्याची 18 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी…
– पदाचे नाव : प्लेसमेंट सेल असिस्टंट, लिपिक, शैक्षणिक लिपिक, नेटवर्क प्रशासक, लेखापाल, सहायक प्राध्यापक (कायदा), प्लेसमेंट अधिकारी, कॉलेज संचालक शारीरिक शिक्षण आणि क्रीडा, प्रशासन अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 09 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2023.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता : armylawcollegepune@gmail.com or principal.alc@awesindia.edu.in
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 18 डिसेंबर 2023.
– मुलाखतीचा पत्ता : आर्मी लॉ कॉलेज, पुणे, जुना पुणे-मुंबई महामार्ग (Nh-4), साईबाबा सेवाधाम, कान्हे, पुणे-412106.
या भरती संदर्भात अधिक माहिती अधिकृत वेबसाईट http://www.alcpune.com/ वरून घेता येणार आहे.