पुणे : लोकसभा निवडणुकीआधी पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सुहास दिवसे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. परंतु पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची अवघ्या 11 अकरा महिन्यांतच बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी जितेंद्र डुडी हे नवे जिल्हाधिकारी असणार आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची जमाबंदी आयुक्तपदी पदोन्नती करण्यात आली आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहे.