नवी दिल्ली : प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Jio च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कंपनीकडून स्वस्तात प्लॅन लाँच केले जात आहेत. त्यात Jio च्या 175 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची माहिती दिली जात आहे. हा प्लॅन चांगलाच फायद्याचा ठरू शकत आहे. डेटासह OTT प्लॅटफॉर्मवरही Access मिळतो. यामध्ये तुम्हाला अनेक ओटीटीमध्ये Access मिळतो.
Jio चा हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह मिळत आहे. यामध्ये तुम्हाला 175 रुपयांमध्ये 10 OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळतो. रिचार्ज प्लॅनमध्ये 10GB हाय-स्पीड डेटा मिळेल. डेटा मर्यादा संपल्यानंतर, युजर्सना 64Kbps च्या वेगाने डेटा मिळत राहील. यामध्ये तुम्हाला कॉलिंग किंवा एसएमएसचे फायदे मिळणार नाहीत. या प्लॅनअंतर्गत तुम्हाला Jio Cinema चे 28 दिवसांचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. या सबस्क्रिप्शनसाठीचे कूपन तुमच्या MyJio अकाउंटमध्ये जमा केले जाईल.
याशिवाय तुम्हाला Sony LIV, ZEE5, Liongate Play, Discovery+, Sun NXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal आणि Hoichoi मध्ये Access मिळणार आहे. तुम्ही Jio TV ॲपद्वारे या सर्व प्लॅटफॉर्मवर Access करू शकाल.